तर शहर विकास निधीतून आणि या सर्व पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाची मोहीमच राज्य मंत्री मा डॉ पंकज भोयर यांनी आपला विकास निधी देवून केला मात्र म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा त्यांचे स्मारक वर्धा शहरात निर्माण होण्याचे नावाने सोयीनुकुल भवन नगर परिषदेच्या जागेवर निर्माण करावे अशी मागणी कल्पना या राज्य मंत्री डॉ पंकज भोयर ना माजी खासदार रामदास तडस, दिवंगत ना आमदार रामदास आंबटकर अथवा नगर परिषदेला आली नाही किंवा आतापर्यंत ज्यांची ज्यांची राजकीय पार्टीचा सत्ता नगर परिषद मध्ये होती किंवा स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जे जे खासदार आमदार, नगर परिषद अध्यक्ष, नगरसेवक झाले त्यांनीही या बाबतीत पुढाकार घेतला नाही.
त्यांच्या त्यांच्या ध्यानी मनी आले नाही हि बाब लक्षात घेऊन सत्यशोधक म ज्योतिराद फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मारक समितीची स्थापना विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येवून केली या समितीच्या वतीने म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या प्रांगणात बसवावा तसेच नगर परिषदेच्या जुन्या पंडीत जागेवर सरकारी रुग्णालया समोरील जागेत अथवा ठाकरे मार्कीट अर्धवट झालेल्या बांधकामाच्या जागी म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे जे सतत सर्वांना प्रेरणास्थान असेल तसेच वर्धा शहरात म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव मंजर झालेल्या नियोजित सांस्कृतिक भवनाला द्यावे यासह नगर बयेदण उद्यानाला सत्यशोधक म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान असे नाव द्यावे यासाठी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक यांना निवेदन व मोठेच सहाय्यक नगर परिषद मुख्याधिकारी यांना देऊन आंदोलनांचा इशारा निवेदनातून व चर्चेतून देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदाच शोधून संपूर्ण जगाला त्यांची सर्वसामान्य यांना हि राजे हाऊ करून देणारे त्यांच्यावर पोवाडा लिहुन त्यांचे कार्यकर्त्यांचा इतिहास मांडणारे पहिली शिवजयंती साजरी करणारे, ब्राह्मणी कर्मकांड बिरुद्द चळवळ उभी करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून संघटन कौशल्य दाखविणारे, शेतक-यांचा आसुड हे पुस्तक लिहुन शेतक-यांची दैन्यवस्था सरकार व समाज समोर ठेवणारे, शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर पसरवून दिन दलित, आदीवासी, भटके, अनुसूचित जनजाती ओ. बि. सी. अतिदलित महिला यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे. ज्यामुळेच आज राष्ट्रपती पंतप्रधान, मुख्यमंत्री मंत्री ते मुख्य सचिव, कलेक्टर, पोलीस अधीक्षक ते चपराशी पर्यंत नोकरीत सहभाग घेवू शकले तर अनेक लेखक, कवि, विचारवंत, आमदार खासदार झाले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म. ज्योतिबा फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानत होते मात्र अशा या दोन्ही महामानव असलेल्या म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा किंवा स्मारक वर्धा शहरात किंवा जिल्ह्यात निर्माण झाले नाही हि आम्हा वर्धकर व वर्धा प्रशासनासाठी, स्थानिक आमदार, खासदार यांच्यासाठी शर्मेची बाब आहे कारण यामागे जातीय राजकीय मानसिकता, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धारेवर चालणा-या संघटनांचा छुपा विरोध आहे हे आजही दिसून येते.
पुण्यातही पहिल्यांदा म. ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवू नये म्हणून त्यावेळी टिळकांनी प्रखर विरोध केला होता व केसरीत भारताचे दुश्मन असा लेख टिळकांनी लिहला होता हे विसरता येत नाही बर्धा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार, हे ओ.बि.सी. असूनही हा विरोधाभास आहे याला ब्राह्मणी प्रवृत्तीचा कावा मानावा काय असे चर्चे द्वारे मांडण्यात आले. ज्याला मूक संमती दिसली त्यामुळे सत्यशोधक म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मारक समितीच्या वतीने आज सत्यशोधक म. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून निवेदन देण्यात आले यावेळी गजेंद्र सुरकार, डॉ सुभाष खंडाले, गुणवंत डकरे, प्राचार्य जनार्दन देवतळे, राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, विनय दहाके, रोहिणी पाटील, कल्पना सातव फुसाटे, मनिष फुसाटे, सविता घोडे, प्रविण गुल्हाणे, अभिजीत भेंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.