प्रतिनिधी / प्रतापगढचे वारेवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंड मधील हल्द्वानीमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर श्रीराम सेनेने सभास्थळी शुद्धीकरण विधी केला, ही घटना केवळ एका नेत्याचा अपमान नाही तर संविधानाच्या समानतेच्या मूल्यांची उघड खिल्ली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष झाली पण आजही दलित नेत्याचा अपमान करण्यासाठी शुद्धीकरणाचे विधी केले जात असतील, तर ही केवळ एका संघटनेची विकृती नाही, तर मनुवादी विचारanchi उजळणी आहे. सभास्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी नालायकांवर कठोर कारवाई करा, अशी मागमी वर्धा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनिल कोल्हे यांनी केली आहे.
यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनिल कोले म्हणाले की, शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेस अध्यक्ष खर्गे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांच्याविरोधात शुद्धीकरण केले का? माणसाच्या जातीवरून त्याला शुद्ध-अशुद्ध ठरवण्याचा अधिकार श्रीराम सेनेला कोणी दिला? भाजपचा या घटनेशी काही संबंध नसल्याचा दावा असेल, तर मग जातीय द्वेषामे प्रदर्शन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘भाजप सरकार पुढे का येत नाही? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान म्हणजे प्रत्येक दलित, वंचित आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या भारतीयाचा अपमान आहे. या प्रकरणी भाजपाने आरोप फेटाळण्यापेक्षा जातीय भेदभावच्या या मानसिकतेविरोधात नेमकी भूमिका काय ते स्पष्ट करावे, असेही सुनील कोले म्हणाले. यावेळी गांधी पुतळ्याजवळ निदर्शन करण्यात आली.. प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.