नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका): वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर दि. २३ ते २७ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषि तज्ञांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

आधुनिक कृषि निविष्ठांसोबत शेतीशी संबंधित अवजारे, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची थेट विक्री असे अनेक उपयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीक, शेतकऱ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *