वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडवे बारे वर्धा – वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा मुख्यालय, कार्यालय इंदिरान सदभावना भवन, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस संगठन मजबूत व्हावे यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक नवनियुक्त वर्धा जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी मा. आमदार व मंत्री श्री. राजेंद्र मुळक व मा. श्री. रणजीत कांबळे (वरिष्ठ उपाध्यक्ष, म. प्र. काँ.क.) यांच्यासह वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी मा. श्री. सुरेश भोयर (दे. वि. स.), मा. श्री. अतुल काटेचा (वर्धा वि.स.), मा. श्री. अनिल गायकवाड (आर्वी वि.स.), मा. श्री. संजय वानखेडे (हिंगणघाट वि.स.), मा. श्री. नगराध्यक्ष शेखभाऊ रोंढे, मा. श्री. सुरेश सिंगाकर (सरचिटणीस म. प्र. काँग्रेस कमिटी), मा. श्री. अष्ट्रद्रय मेथे, मा. श्री. प्र. काँ. कमिटी), श्री शैलेशजी अग्रवाल राष्ट्रीय समन्वयक यांच्या उपस्थितीत पार पडली.

वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक संघटनात्मक आढावा व कार्यकारणी सह जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत राबवल्या कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मनोजभाऊ चांद्रक यांनी केले. आढावा बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी कार्यकारिणी व संघटनात्मक आढावा सादर करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत या प्रकारचे सुतोवाच केले.

बैठकीत जिल्हातील संगठन अधिक सक्षम आणि मजबूत दाखवा व येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी व रणनीती सादर सरखेल वर्मा करण्यात आली. यावेळी मा. श्री. राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजुटून स्थानिक पातळीवर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले आणि काँग्रेस पक्ष हा समाजहितासाठी सदैव लढत राहील असा विश्वास व्यक्त केला. बूथ लेवलवर चर्चा करावी व नवीन वि. एल. ए. तयार करावे, मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असा सूचना मा. आमदार व मंत्री श्री. रणजीतदादा कांबळे यांनी बैठकीत दिले. बैठकीत जिल्हातून आलेले काँग्रेस पदाधिकारी विचार ठेवत अनेक महिला व पुरुषांनी पक्षात प्रवेश केला व काहीना पदनियुक्त करून पद देण्यात आले. यावेळी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून सर्व सेल अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला पुरुष यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *