रिपब्लिकन सेनेचे विदर्भ अध्यक्ष मा.प्रफुल्लभाऊ शेंडे याची निवड झाल्यानंतर विदर्भ दौऱ्यावर असताना वर्धा जिल्हा मध्ये स्वागत करण्यात आले

रिपब्लिकन सेनेच्या विदर्भ दौऱ्यावर करत असताना नागपुर दीक्षाभूमी पासून सुरू करून वर्धा जिल्हा मध्ये प्रथम आगमन झाल्याबद्दल विदर्भ अध्यक्ष मा. प्रफुल्ल भाऊ शेंडे याचे दि 18/9/2025 रोजी स्वागत करण्यात आले,गेल्या 5 ते 7 वर्षापासून त्यानी शाहू ,फुले,आंबेडकर चळवळीत त्याचे मोलाचे योगदान असुन ,नागपूर येथे रेशीम बाग येथील मैदानात भव्य कार्यक्रम आयोजित केला होता,सामाजिक चळवळीत काम करत असताना कार्यकर्ता चे सम्पूर्ण काम पूर्ण होऊ शकत नसल्याने व राजकीय भूमिका घेतल्याचे त्यानी सांगितले , राजकीय सत्ता म्हणजे केवळ सत्तेचे स्थान नव्हे, तर सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे, त्यांनी अस्पृश्यता व जातीभेद नष्ट करून, समतेवर आधारित समाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि उपेक्षित घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी राजकीय सत्तेचा उपयोग केला पाहिजे. राजकीय सत्ता हे सामाजिक आणि नैतिक विवेकाद्वारे हक्कांचे संरक्षण करण्याचे माध्यम आहे, तसेच लोकशाहीचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण करण्यासाठी ते आवश्यक आहे. असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ,त्याच आधारावर पाउल टाकत सरसेनापती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर करत आहे ,तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देईल सांगत रात्रंदिवस पक्ष बांधणी साहेब करत आहे.त्याच विचारला प्रभावित होऊन मा. शेंडे यांनी पदभार स्वीकार केल्याचे कार्यकर्ताना सांगितले.त्याचबरोबर येणाऱ्या आगामी निवडणूक मध्ये रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे ठेवणार असून जास्तीत जास्त निवडणू आणू असे ते म्हणाले.तेव्हा भिम आर्मी विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी त्याचे स्वागत केले ,त्यावेळी बंटी रंगारी ,दीक्षित सोनटक्के , अमोल चिमुरकर ,वैभव नाखले,प्रशिल पानबुडे,आकाश पाझारे,इतर कायकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *