निर्भय मॉर्निंग वॉक करून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन….

प्रतिनिधी/ दै.प्रतापगढचे वारे:वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची काही हिंदुत्ववादी माथेफिऱू असलेल्या तरुणांनी जवळून रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून सकाळी मॉर्निंग वॉक ला फिरत असताना पुणे येथील दांडेकर पुलावर हत्या केली त्याला आज २० ऑगस्ट ला तेरा वर्षे पूर्ण झाली मात्र अजूनही मुख्य सूत्रधार व हत्या मागील मास्टर माईंड यांना अटक तर सोडाच साधी चौकशीही करण्यात आली नाही उलट ज्याने डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोली झाडल्याचा प्रत्यक्ष साक्ष असल्याचे सचिन अंदुरे याची जन्मठेपेची झालेली शिक्षा रद्द करून अवघ्या दोन दिवसाआधी जामीनावर सुटका करण्यात आली ही कार्यकर्त्यांसाठी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी वेदना देणारी घटना आहे याचा निषेध म्हणून व शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज गुरुवारी सकाळी ६-३० वा २० ऑगस्ट रोजी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक करून शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन केले याप्रसंगी राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे यांनी प्रबोधनपर गीत म्हणून निर्भय मॉर्निंग वॉक ची सुरुवात केली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ येथे सकाळी ६-३० वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सोशलिस्ट चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक सामाजिक कार्यकर्ते येथे एकत्र येऊन समापन करण्यात आले यावेळी निर्भय मॉर्निंग वॉक मध्ये सामाजिक कार्यकर्ते मा प्रविण पेठे, मराठा सेवा संघाचे ॲड. नंदकुमार वानखेडे, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी संघटनेचे मा धनंजय धावणजेवार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, जिल्हा विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह सुनील ढाले प्रशिक्षण, जिल्हा प्रधान सचिव भरत कोकावार, शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे जिल्हा कार्यवाह दिलीप गुळघाणे वरिष्ठ कार्यकर्ते, निखिल जवादे ईश्वऱ धोंगडे, राजेश कांबळे, सिद्धार्थ मेंढे यांनी निर्भय मॉर्निंग वॉक मध्ये सहभाग घेऊन आम्ही गोळ्यांना न भिता विवेकी विचार समाजात पेरत राहू माणूस मारता येतो त्याचे विचार मारता येत नाही हा संदेश निर्भय मॉर्निंग वॉक करून जहाल हिंदुत्ववाद्यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *