प्रतिनिधी / दै. प्रतापगडाचे वारे वर्धा – डिजिटल अरेस्ट करून फिर्यादीस कुटुंबियांसह अटक करण्याची धमकी देत फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी आरोपीस गुजरातच्या सुरत येथून अटक केली.फिर्यादीस मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने सायबर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचे नावे अंधेरी मुंबई येथे सिम खरेदी करण्यात आले, त्याबदले फिर्यादीचे नावे बॅकराँ बँकेत खातें उघडन २ कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले.
फिर्यादीचे मोबाईलवरून १०० लोकांना फसवणूकचे संदेश गेले आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीस कॉलव्दारे पोलीस गणवेशातील बनावट अधिकाऱ्याने फिर्यादीशी बोलून २ कोटी गैरव्यवहार संस्था तसेच इतर केंद्रीय तपास यंत्रणा यांचे संयुक्त तपास पथक असून फिर्यादी यांची चौकशी सुरु आहे, अशी भिती दाखवाली. त्यांना डिजिटल अरेस्ट करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना अटकेची भिती दाखवून त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये आरोपीने दिलेल्या खात्यांवर ट्रान्स्फर करण्याची सांगितले. यावरून फिर्यादी यांनी भीतीपोटी रक्कम ट्रान्स्फर केली. त्यानंतरही पुन्हा रकमेची मागणी केली असता अटकेची भिती दाखवून डिजिटल अरेस्ट करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने तक्रार करण्यात आली. त्यावरून सायबर पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावरून आरोपी सैयद अशफाक सैयद अदीम (वय ३६) रा. अमरोली, सुरत (गुजरात) यास सुरत (गुजरात) येथून गुन्ह्यात अटक करण्यात आली.
आरोपीचा दि. २९.०९.२०२५ पावतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात येवून गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. गुन्ह्यात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनांत पोलिस निरीक्षक नागकुमार चाचरकर, अनुप राऊत, ओमप्रकाशकोल्हे, निलेश तेलरांधे, वैभव कऱ्हाजवार, अमित शुक्ला, रणजित जाधव, अनुप कांबळे, संचेनिन कांबळे, पवन झाडे, प्रतिक बेंदळे, लेश गठाड, आरती पारसे यांनी केली.