खासदार अमर काळे यांनी घेतली दखल
प्रतिनिधी – दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलुकाटे येथे असलेल्या नवोदय विद्यालयाच्याविद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती खासदार श्री. अमर काळे यांना कुणीतरी दिली. माहिती प्राप्त होताच खासदार अमर काळे यांनी अन्न औषध प्रशासन विभाग, वर्धा यांना फोन करून तातडीने अन्नाचे नमुने घेण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी आरोग्य विभागालाही फोन करून त्वरित डॉक्टरची चमू सेलुकाटे येथील नवोदय विद्यालयात पाठवून ज्या मुलांना विषबाधा झाला असल्याचे संशय आढळला त्या विद्यार्थ्यांची तात्काळ तपासणी करावी असे निर्देश दिले.
खासदार अमर काळे यांच्याकडे नवोदय विद्यालयाच्या अनेक पालकांकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या बाबतीत तसेच नवोदय विद्यालयात चाललेल्या गलथान कारभाराबाबत अनेकदा तक्रारी केल्या गेल्यांत. त्यामुळे नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या ? विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. पालकांकडून अनेकदा तक्रार करूनही नवोदय विद्यालय प्रशासन तक्रारीची दखल घेत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्ल्यांच्या सुरक्षिततेत विषयी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या अन्नातून विषबाधेचा प्रकार जिल्ह्यात निदर्शनास आला होता. विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नातून असे प्रकार होणे हा फारच चिंतेची विषय असून या बाबी प्रशासनाने गंभीरतेने घेऊन भविष्यात घडणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. खासदार अमर काळे यांनी मिळालेल्या माहितीवरून वेळीच दखल घेऊन केलेल्या उपाययोजनेबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.