मतदान विकत घेतल्याच्या हाके यांच्या आरोपाची चौकशी करा

प्रहार शिक्षक संघटनेची निवडणूक आयोगाकडे मागणी

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : २३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या राज्यातील २ शिक्षक व ३ पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर करून मते विकत घेतल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. हा आरोपची चौकशी निवडणूक आयोगाने करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली.

विशेषः अमरावती व पुणे शिक्षक मतदार संघात सत्ताधाऱ्यांनी १० ते १५ हजार रुपयांमध्ये शिक्षकांचे मत विकत घेतल्याचा आरोप हाके यांनी केला व तशा बातम्या प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या. शिक्षक हा समाज निर्माता असून त्यांनी आपले स्वतःचे मत १० ते १५ हजार रुपयात विकतली किंवा कोणी विकत घेतले हा आरोप शिक्षकांची बदनामी करणारा आहे व शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य संपविणारा आहे. जर असे घडले असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे व हे निवडणूक आयोगाकरिता फार मोठे आव्हान असल्याचे अजय भोयर यांनी निवेदनात नमूद केलेले आहे.

विधान परिषद च्या ५ जागांसाठी पार पडलेल्या विशेषः त्यामध्ये अमरावती व पुणे शिक्षक मतदार संघात पार पडलेल्या निवडणुकीत अशी कोणती अनुचित बाब घडली काय? याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, कारण यातून शिक्षकांची प्रचंड बदनामी झालेली आहे. जर यामध्ये किंचितही वस्तुस्थिती आढळली तर पैसे घेऊन मतदान करणाऱ्या व पैसे देऊन विशिष्ट व्यक्तीस मतदानास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच याबाबत निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

जर यामध्ये सत्यता नसल्यास लक्ष्मण हाके यांचे विरुद्ध शिक्षकांची बदनामी केली या संबंधी खाली कठोर कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शिक्षक संघटनेचे संतोष महाजन, किशोर डंगरे, कुंडलिक राठोड, अमोल वाशिमकर, मनीष मारोडकर, अविनाश धाकड, रहीम राहा, निलेश डहाळे, राजीव धाकड, अनंता पोराटे, प्रगोज बनकर, सुधीर साटोणे, मुकेश इंगोले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *