हिंगणघाट शहरात अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या घराचे व दुकानाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

हिंगणघाट: हिंगणघाट शहरात अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या घराचे व दुकांनाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात शहर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
शहरात दिनांक १२ सप्टेंबरला दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हिंगणघाट शहरामध्ये नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगफूटीदृश्य झालेल्या या पावसाने सर्वाधिक फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसला आहे. नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या मलनिस्सारन आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम पूर्णपणे फेल ठरले. सिमेंट रोड बांधकाम व अमृत योजनेसाठी खोदलेले खड्डे नागरिकांच्या अडचणीत भर घालत आहे. उपजिल्हा रुग्णालय परिसरात अक्षरशः त्या दिवशीच्या पाण्याने तलावाचे स्वरूप आले होते.
शहरातील यशवंत नगर, रिठे कॉलनी, दत्त मंदिर वार्ड, शिवाजी वार्ड, संत चोखोबा वार्ड, पटवाडी कॉलनी, रंगारी वार्ड, विरभगत सिंग वार्ड आणि भीमनगर वार्ड तसेच शहरातील अनेक भागातील अनेक घरात पाणी साचल्याने नागरिक घरात कैद झाले होते. अनेक घरात व दुकानांत पाणी शिरल्याने फर्निचर, कपडे, अन्न-धान्य व इतर वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर व्यवसायिकांना लाखों रुपयांच्या नुकसान सहन करावा लागला आहे. शहरातील अनेक भागामध्ये पानी साचल्याने गंभीर स्थिति निर्माण झाली होती. पावसाची तीव्रता किती होती याचा अंदाज पंजाब नॅशनल बँके लगत असलेल्या जुन्या इमारतीच्या भाग रात्री कोसरल्यावर आला.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिनांक १२ सप्टेंबर पासून चार दिवस उलटून देखील आतापर्यंत शासनाने नुकसानग्रस्त घराचे व दुकानाची दखल सुद्धा घेतली नसून पंचनामे केलेले नाहीत.करिता वरील विषयाला गांभीर्याने घेऊन हिंगणघाट शहरात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त घराचे व दुकानाचे पंचनामे तातडीने करून आर्थिक मदत द्या असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात शहर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बालु वानखेडे,शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, समाजसेवक सुनील डोंगरे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,उमेश नेवारे,गजानन महाकाळकर, अमित रंगारी, पंकज भट्ट, मनोज मुरार, समीर बाळसराफ,विजय हजारे, विनोद वानखेडे, राजू मुडे, हुकेश ढोकपांडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *