प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-सेलु : स्थानिक विकास चौकात बस स्टॉप तर आमदार पंकज भोयर यांनी लोकांची हेल्पलाईन बनवून दिलेले असले तरी ते प्रवाशांना कमी उपयोगात येत असून थकलेले मागल्यांसाठी व दारू ढोसणाऱ्यांना काहीवेळ विश्रा घेणाऱ्यांसाठी आश्रयस्थळ ठरत आहे. तसेच चुटपुटैय्या पाकिटरपेशा नेत्यांनी आपल्या वाढदिवसाची, निवडणुकीची जाहिरातीचे पोस्टर लावण्यासाठी जास्त उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे. परंतु लघूशंका जाण्यासाठी बाजूला रिकामी जागा असून मुत्री घराची व्यवस्था नसल्याने हे निकामी ठरत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या विकास चौक ग्रामीन भागात जाणाऱ्या राज्य परिवहनच्या अनेक बसेस जातात. पण या बसस्टॉपवर थांबत नाही. ही शोकांतिका आहे. सदर विकास चौकात अनेक शासकीय कार्यालय आहेत. आजूबाजूस्या गावीतील लोकांना हा चौक सोईचा पडतो. महिला, शालेय व उच्च शिक्षण घेण्यासाठी वर्धा, नागपूर ये-जा करणाऱ्या मुलींची, कर्मचारी महिलांची बरीच संख्या दिसून येते. परंतु लघूशंका जाण्यासाठी मुत्री घराची व्यवस्था नसल्याने त्यांना चांगलेच मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबतीत ग्राम क्र. ६ च्या नगरसेविका सौ. गीता रामगडिया यांच्याकडून संबंधितांसह ग्रामपंचायत चे लक्ष वेधण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
विकास चौकातून नागपूर, वर्धा तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात आवागमन करणारे मोठ्या संख्येने प्रवासी दिसून येतात. त्यांना झाडांचा आडोसा घेऊन बसेसची प्रतिक्षा करावी लागते. कारण येथील बसस्टॉपवर एकतर बसेस थांबत नाहीत व त्याही हात बस स्टॉप समोर अनधिकृत हातगाडीवाल्यांनी व्यवसाय थाटलेले आहेत. त्याच्या बाजूला मोकळी जागा असून मुत्री घराची व्यवस्था नसल्याने मिनी बसस्थांना शोभेची वस्तू बनून राहून गेलेले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी आवर्जून लक्ष घावे अशी मागणी जोर धरत आहे.