सोयाबीन व कपाशी पिक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी;राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार पक्ष)
हिंगणघाट : – हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझाँक, हुमळी अळी, चारकोल रॉट यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, हिरवीगार शेतपीक पूर्णतः पिवळी पडून नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून शासनाने प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली आहे. मात्र केंद्र सरकारने विदेशातून कापूस गठाण आयातीवरील ११ टक्के शुल्क शून्य केल्याने स्थानिक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आयात शुल्क माफीचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सीसीआयने हमीभावाने कापूस खरेदी करण्याची हमी द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीतून दिलासा द्यावा, मोफत वीजपुरवठा करावा आणि पीक विमा योजना ३१ डिसेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, समुद्रपूर तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, काँग्रेस किसान सेलचे प्रशांत गहूकर, विजय तामगाडगे, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, किसान सेल जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन परसाडे, महिला तालुकाध्यक्ष सौ. कविताताई वानखेडे , सौ सीमाताई तिवारी, मीनाताई सोनटक्के, सुजाताताई जांभुळकर, दिपालीताई रंगारी, अजय परबत, देवा शेंडे, प्रशांत एकोणकर, जगदीश वांदिले, सुनील घोडखांदे, सुनील भुते, सुशील घोडे, संदीप चाफले, प्रवीण भूते, विजय हजारे, अमित रंगारी, गजू महाकालकर, राजू मुडे, विपुल वाढई, समीर बाळसराफ, रवी बोरकर, संजय वरघने, संजय कारवटकर, गजानराव गिरडे झापरुजी मडावी, दुर्गाबाई सातघरे, वच्छलाबाई किनाके, सविताबाई मडावी, दयाबाई सातघरे, अजबराव कुडुमते, गणपतराव तडस आदी उपस्थित होते.