शिव भोजन थाळी केंद्रात मिळतात शिळे अन्न; ग्राहक उपाशीपोटी निघाले

वर्धा:- महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शिव भोजन थाळी केंद्र . सत्कार भोजनालय चालक प्रताप पंचवानी असून स्टेशन समोर वर्धा येथे आजघडीला भोंगळ कारभार सुरू आहे.

ग्राहकांना निक्रूष्ट दर्दर्जाचे भोजन दिले जाते. असा दि. ११ सप्टेंबर ला १२:३० दरम्यान अनुभव आला आणि मनस्ताप सहन करावा लागला. कशातरी शिळ्या भाज्या..बीनचव पोळी भात.पातळ वरण. या कारणाने शिव भोजन केंद्रातून आखोदेखा हाल पाहून सगळे उपाशी पोटी लोकं वापस गेले आहे.

संबंधितांना ग्राहकांनी विचारपूस केली असता उलट अरेरावी करत म्हणतात की आमची कंप्लेट करा. जे होते ते करून घ्या. आजघडीला पावसाळ्याचा दिवस आहे. रोगराई बढती वर आहे आणि असे शेळे अन्न ग्राहकांना दिले तर त्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.म्हणून शासनाने लक्ष देण्याचे आवाहन कोपरा येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश राऊत .अभिमन्यू बोंडे.धानोली गावचे सहा विद्यार्थी आणि चार महिला यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *