प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : हिंगणघाट येथील इज्तेमाई शादी सोहळ्यात खासदार अमर काळे यांनी भेट देऊन उपस्थित जोडप्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे व शांतीचे जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
दि. ११/०१/२०२६ ला हिंगणघाट येथे अल खिदमत फाउंडेशन, हिंगणघाट तर्फे इज्तेमाई शादी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री. अमर श. काळे यांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्यात जवळपास २० ते २५ जोडप्यांचा निकाह पार पडला. या प्रसंगी खासदार अमर काळे यांनी सर्व जोडप्यांचे अभिनंदन केले व त्यांना सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना खासदार अमर काळे यांनी सांगितले की, इज्तेमाई शादी सोहळा हा विदर्भात केवळ हिंगणघाट येथे गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जात आहे.
या सोहळ्याचे उत्तम नियोजन आयोजकांनी केले. यात अल खिदमत फाउंडेशन.हिंगणघाट च्या प्रत्येक सदस्याने या सोहळ्याच्या उत्तम नियोजनासाठी सहभाग देऊन हा सोहळा उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल तसेच एक चांगला सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल पूर्ण टीमचे खासदार अमर काळे यांनी अभिनंदन केले.