प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वार वर्धा : गावठी मोहा दारूची वाहतूकप्रकरणी सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोपेड व मोटर सायकलवर दारूबंदीबाबत प्रो रेड कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये आरोपी मोहा दारूची वाहतूक करताना मिळून आले. जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपींच्या ताब्यातून १९ प्लास्टीक पिशव्यांमध्ये ५७,३८० रुपयांचा दारूसाठा, तीन मोटारसायकल असा ३,९२,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी यश भाष्कर कोल्हे, रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट, सोहेल शेख जावेद शेख, रा. सेट्रल वार्ड हिंगणघाट, आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट, चेतन महेश वाटमोडे, रा. संत चोखोबावार्ड हिंगणघाट, तेजस राजु कांबळे, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट, जगदिश अमर तेलतुमडे, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट, आकाश उर्फ लिंबु अमर तेलतुमडे, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणाघाट या सात जणांवर हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके यांनी केली.