नरेश कुमरे हे आदिवासी समाजासाठी प्रेषित : इमरान राही

प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वार वर्धा : सामाजिक कार्य त्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या असतो तेव्हा तो समाजासाठी एक दैवी योग असतो असाच एक प्रेषित या भूतलावर जन्माला आला आहे आणि तो म्हणजे नरेश कुमरे आपले जीवन आदिवासी समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित मुला बाळाच्या शिक्षणासाठी समर्पित करणारे त्यांच्यासाठी आरोग्याची सुविधा कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष देणारे आधुनिक सोयी सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे असे अनेक विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सर्वसामान्य प्रमाणे जीवनाच्या प्रवाहात आणणारे मात्र तरीही प्रसिद्धीपासून स्वतः ला अलिप्त ठेवणारे नरेश कुमरे हे एक बहूआयामी व्यक्तिमत्व आहे अशी भावना ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही यांनी व्यक्त केली ते ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम द्वारा नागपूर येथे कमला नेहरू महाविद्यालयाच्या सभागृहात शास्त्री गौरव पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळीचे ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल तर प्रमुख अथीती म्हणून ज्येष्ठ साहित्यकार डॉक्टर सागर खादीवाला डॉ एस कुमार, डॉ रवी चोहान, डॉ अनिल दक्ष, फोरमचे राष्ट्रीय महासचिव अबुबकर खान , लक्ष्मण नारायण चड्डा, इमरान राही, इंद्रजीत लोणारे , किरण फुलझेले, दामोदर खिची, रमेश बडोदेकर, कविता हिंगणकर, आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते नरेश कमरे यांना शाल,श्रीफळ, फुलगुच्छ, प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह,देऊन सत्कार करण्यात आले त्यांचे एडवोकेट सुनील चौधरी डॉ प्रदीप कश्यप, एडवोकेट असद खान पटेल राजू लभाने एहसान राही राजेश धोपटे अभियंता विजय नाखले मंगेश भोंगाडे प्राध्यापक मोहन मोहिते भगवान आहुजा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे नरेश कुमरे यांनी आपले श्रेय नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे मुंबई अध्यक्ष बंधू सुनिल कुमरे दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *