बहुजन समाज पार्टीचा भारतीय संविधान हाच बसपाचा जाहीरनामा

प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पार्टीच्या वतीने वर्धाविधानसभा: विशाल रामटेके, देवळी-पुलगाव विधानसभा: उमेश म्हैसकर, हिंगणघाट विधानसभा: प्रलय तेलंग, आर्वी विधानसभा : ईजी. दादाराव उड़के या चार उमेदवारांना बसपा तर्फे अधिकृत उमेदवारी देवून अर्ज दाखल केलेले आहेत. वर्धा जिल्ह्यात बहुरंगी निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक विधानसभेत ४ ते ५ उमेदवार मैदानात आहे; त्यामुळे मताची विभागणी होणार आहे त्याचा फायदा घेऊन यावेळी बसपा चे सर्व उमेदवार जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागले आहे. इतर राजकीय पक्षांसारखा बहुजन समाज पार्टीचा निवडणूक जाहीरनामा नसतो ।

‘भारतीय संविधान हाच बसपाचा जाहीरनामा’ आहे. सरकारी नोकर्‍या, जुनी पेन्शन योजना, शेतीमालाला भाव,मोफत शिक्षण, उत्तम आरोग्य सोयी, ग्रामीण भागातील रस्ते, वाढती महागाई, दररोज शुद्ध पाणी, महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी पोलिस संरक्षणाची कठोर कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी, रोजगार निर्मिती, शहराचे सौंदयर्थीकरण इत्यादी प्रमुख ज्वलंत विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. त्याच त्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्य नवीन होतकरु उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावे हेच बहुजन समाज पार्टी तर्फे मतदारांना आव्हान पत्रकार परिषदेतून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव मोहन राईकवार , जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *