प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महाविकास आघाडीच्यावतीने वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव आणि वर्धा हे दोन उमेदवार काँग्रेसकडे आले तर आर्वी आणि हिंगणघाट ह्या जागा राष्ट्रवादीकडे गेल्या आहे. राष्ट्रवादीने हिंगणघाट मतदार संघातून अतुल वांदिले यांना उमेदवारी जाहीर केली. तर आर्वी विधानसभा मतदार संघाटतून खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे.
तर देवळी, पुलगाव मतदार संघातून विद्यमान आमदार रणजीत कांबळे यांना उमेदवारी दिली असून वर्धा विधानसभा मतदार संघात चौथ्यांना काँग्रेसने शेखर शेंडे यांना उमदेवारी जाहीर केली होती. आज काँग्रेसचे उमेदवार म्हणून शेखर शेंडे यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला आहे. यापूर्वी नालवाडी येथील अनुसया मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील सहभागी पक्ष कार्यकर्त्यांची सभा घेवून काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला. यावेळी उबाठाचे निहाल पांडे, आपचे प्रमोद भोमले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, काँग्रेसचे नेते डॉ.अभुदय मेघे, राष्ट्रवादीचे प्रवक्ता नितेश कराळे, सह काँग्रेसचे व घटक पक्षातील कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे हे भावनिक झाले. त्यांनी वर्धा जिल्हा हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन केले.