आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडे निवडणूक विभागाची करडी नजर

प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. शासकीय कार्यालये, विश्रामगृहे आदी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे, सभा घेणे आदींवर निर्बंध आहेत.शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विदृपीकरण करता येणार नाही, तसे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करताना ताफ्यामध्ये अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करता येणार नाही. उमेदवारांचे तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे १०० मीटर परिसरात व दालनात ५ व्यक्तींव्यतिरिक्त प्रवेश करण्यासनिर्बंध राहणार आहे. प्रक्रिया पूर्ण होईपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणे करण्यावर निर्बंध आहे. धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करता येणार नाही. निवडणूक प्रक्रियापूर्ण होईपर्यंत जात, धर्म, भाषावार शिबिरांचे आयोजनकरण्यावर निर्बंध आहेत. निवडणुकीच्या प्रचाराकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे आदी बाबींवर निर्बंध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *