राजकीय पक्ष सोशल मीडियावर सक्रीय !

प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे हिंगणघाट : जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीकडून अद्याप पूर्णपणे उमेदवार घोषीत व्हायचे आहेत. केवळ भाजपाचे तीन तर काँग्रेस चे तळ्यात की मळ्यात आहे.तरी देखील सोशल मीडियावर विविध राजकीय चर्चेला रंग चढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांच्या समर्थकांनी आपलाच नेता कसा उत्तम आहे, याचे चित्रण सोशल मिडीयावर करीत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतःची सोशल मीडियाची टीम एक्टिव्ह केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.पूर्वी बॅनर, प्रचार करणारी वाहने,जनप्रतिनिधींच्या सभा, कॉर्नर सभा यातूनच राजकीयनेत्यांचा प्रचार केला जायचा. पूर्वीच्या काळी लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी नेते, गावपुढारी सांगतील तोच आदेश ग्रामस्थांना मान्य करावा लागत असे. नेत्यांनी सांगायचे आणि गावकर्‍यांनी ऐकायचे, अशी स्थिती पूर्वी होती. परंतु, आता मात्र सोशल मीडियाच्या वापरामुळे राजकीय वर्तुळात काय सुरू आहे. वेगवेगळ्ळ्या पक्षांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाइलवर मिळत आहे. ग्रुपवर प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या कार्याचा गाजावाजा शेअर करीत आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता मोबाइलवर ढवळून निघू लागले असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे.निवडणूकीत राष्ट्रीय राजकीय पक्षाचे उमेदवारांसह प्रादेशिक व अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. शहर व ग्रामीण भागात कोठेही उमेदवारांचे पोस्टर नाही व गल्लोगल्ली गोंगाट करणारे भोंगेही दिसून येत नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये पाहिजे तसा लोकसभा निवडणुकीचा उत्साह दिसून येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *