निवडणूक कामकाज बिनचूकपणे पार पाडावे :जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वार वर्धा : निवडणूक कामकाज हे अत्यंत जोखमीचे असून प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया पार पडतांना कुठली कुठली खबरदारी घ्यावी, यासाठी हे प्रशिक्षण असून प्रशिक्षणात सांगण्यात आलेल्या प्रत्येक बाबींचे काटेकोर पालन केल्यास चूक होणार नाही. मतदान पथकासोबत आपणास देण्यात येणार्‍या लेखी सूचनांचे बिनचूक पालन केल्यास निवडणूक कामकाज अचूकपणे पार पडण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सांगितले. वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. वर्धा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदिप पुंडेकर, मलिक विराणी व श्रीमती कौशल्याराणी पाटील सर्व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ४७ वर्धा विधानसभा मतदार संघ हे उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ अंतर्गत ४७ वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण २६ व २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. त्यानुसार २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रथम सत्र ९.०० ते दुपारी १२.३० व द्वितीय सत्र दुपारी १.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत चरखा भवन सभागृह सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. चरखा भवन सभागृह येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदार संघ वर्धा दिपक कारंडे यांनी पीपीटीद्वारे मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेत मतदानघेण्याकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची काय जबाबदारी आहे, निवडणूकीबाबतच्या कायदेशीर बाबी, ईव्हीएम मशीनबाबत सर्व माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडावी, टपाली मतपत्रिका, विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये नव्याने झालेले बदल, अभिरुप मतदान, पथकांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सादर करावयाचे विविध नमुने अहवाल इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कार्य असल्याने निवडणुकीचे कामात सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *