प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : हिंगणघाट रस्त्यावरील कवडघाट जवळील रस्त्यात अनेक खड्डे पडल्याने हा रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावरुन केवळ अर्धा किलोमीटरचा हिंगणघाट जवळील रस्ता हा वर्धा ते हिंगणघाट रस्त्यावरील संपुर्ण प्रवासाचा थकवा या रस्त्यावर येत होता. जवळपास १-१ फुटाचे खड्डे या रस्त्यावर पडले होते.
या संपुर्ण रस्त्यावरच खड्डे असल्याने खड्ड्यातूनच वाहन धारकांना प्रवास करावा लागत होता. सदर बाब खासदार अमर काळे हे या भागात दौऱ्यावर असतांना त्यांचे लक्षात आली त्यांनी वाहन धारकांना होणारा त्रास प्रत्यक्ष अनुभवला व तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र दिले व फोन करुन हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिलेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांनी खासदार अमर काळे यांचे पत्र व फोनवरील निर्देशाची तात्काळ दखल घेऊन या रस्ता दुरुस्तीचे काम दिनांक १३/०१/२०२६ ला पुर्ण झाल्याचे या विभागाचे अभियंता श्री. वानखेडे यांनी खासदार कार्यालयाला सांगितले.
खासदार श्री. अमर श. काळे यांनी वेळीच नागरीकांच्या समस्यांची तत्परतेने दखल घेतल्याबद्दल अनेकांकडून खासदारांप्रती आभार व्यक्त करण्यात आले व सर्व सामान्यांच्या सार्वजनिक प्रश्नाची तत्परतेने दखल घेऊन खासदार श्री. अमर काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ते एक सर्व सामान्यांचे नेते म्हणून समजले जातात.