माणसातली माणुसकी जपणारा एक सहृदयी नेता खासदार अमर शरदराव काळे

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावर सारवाडी घाटाजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोन रक्तबंबाळ तरुणांना तातडीने उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करून समोरा समोर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अमरावती येथे रवाना करून खासदार अमर काळे यांनी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या माणुसकीचे दर्शन पुन्हा घडले व राष्ट्रसंतांच्या मानवधर्माची शिकवण व त्यानुसार आचरण याचा प्रत्यक्ष अनुभवच दोन अपघातग्रस्त तरुणांनी घेतला.

नागपूर-अमरावती महामार्गावर दुपारी ५ वाजता सारवाडी घाटाजवळ नागपूर वरुन अमरावतीकडे जाणाऱ्या दोन तरुणांचा दुपारी ५ वाजता दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात दोन्ही तरुण जबर जखमी झाले व रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. महामार्ग असल्याने वाहनांची सतत ये-जा होती परंतु त्या दोन्ही अपघातग्रस्त तरुणांची दखल कोणी घेतली नाही.

अशातच खासदार अमर काळे आपला दौरा आटोपून परत येत होते. खासदार म्हटले की, सर्वसामान्यांना एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते. डोळ्यावर काळा गॉगल गाडीच्या काळ्या काचा, त्यात थंडगार ए. सी. मध्ये थाटामाटात प्रवास करणारी व्यक्ती. पण अमर काळे याला अपवाद ठरतात, जेव्हा ते लोकांत मिसळतात तेव्हा ते लोकांसारखे सर्वसामान्य वागतात कधी खासदारकीचा बडेजाव न बाळगणारा एकमेव नेता. कुणाच्याही सुखदु:खात खुल्या मनाने धावून जाणारे सहृदयी व्यक्तीमत्व. कायम स्वरुपी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, मेहेरबाबा या संतांच्या विचाराचा कायमस्वरुपी पगडा असलेले खासदार अमर काळे यांनी तो अपघात पाहिला व वाहन चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले, लगेच खाली उतरले, विचारपूस केली क्षणाचाही विलंब न लावता अपघातग्रस्त मुलांना गाडीत टाकले व थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथेही त्यांची तळमळ तिच. दवाखान्यात नेऊन डॉक्टरांचे उपचार चालू असतांना स्वतः तिथे थांबले व डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अमरावती येथील हॉस्पीटलला पुढील उपचारार्थ रवाना केले.

अधिकच्या माहितीनुसार हे दोन्ही विद्यार्थी एम.बी.बी.एस. ला शिकत असून व एक नागपूरचा तर दुसरा गोंदियाचा होता. ह्या तरुणांशी संपर्क साधला असता त्यांनी खासदार अमर काळे यांचे रूपाने आम्हाला देवच भेटला. खासदार अमर काळे यांनी आमची दखल घेतली नसती तर पुढे काय झाले असते हे परमेश्वरालाच ठाऊक, खासदार अमर काळे यांनी दोन तरुणांचे नाही तर दोन्ही भावी डॉक्टर रूपाने भविष्यात हजारो लोकांचे जीव वाचविणाऱ्या देवदुताचेच प्राण वाचविले असून या घटनेबाबत खासदार अमर काळे यांचे रूपाने आज समाजातील खऱ्या माणुसकीचे दर्शनच घडून आले असा सर्वसामान्यांकडून सूर ऐकू येत आहे. खासदार अमर काळे हे आपला संयमीपणा व कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आहे. रंजल्या गांजल्यांना मदत करणे हे बाळकडू त्यांना त्यांची आई अनुराधा काकू व डॉ. शरदराव काळे साहेब यांचे कडून मिळाले असून ते आजही सौ. मयुराताई काळे यांच्या समर्थपणे मिळत असलेल्या साथीने जपत आहे. ह्याच त्यांच्या स्वभावामुळे तळागाळतला कार्यकर्ता सुध्दा त्यांच्या सोबत हातात हात घालून उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *