प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रासाठी होणार्या निवडणुकीकरीता गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी नामांकन अर्ज दाखल करून पहिला नामांकनाचा भरण्याचा मान व श्री गणेश केला. दुपारी साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी वंदना सवरगंपते यांच्याकडे चार सेटमध्ये कुणावार यांनी आपले नामांकन पत्र दिले. यात वेगवेगळे अनुमोदक आहे. यावेळी त्यांच्यासोबत वर्धा जिल्ह्याचे भाजपाचे वरिष्ठ निरीक्षक मध्य प्रदेश सरकारचे मंत्री प्रल्हाद पटेल, माजी खासदार रामदास तडस, जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, प्रेम बसंतानी, रमेश धारकर, शांतीलाल कोचर, गंगाधर कोल्हे, छाया सातपुते, नलिनी सयाम, उमेश तुळसकर, अॅड. मद्दलवार, सोहम कुणावार, आंबटकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आतापर्यंत हिंगणघाट विधानसभा क्षेत्राकरिता विविध उमेदवारांनी ८० उमेदवारी नामांकन पत्र नेले आहे. गुरुवारी विद्यमान आमदार समीर कुणावर यांच्या निवासस्थानापासून चार चाकी वाहनांनी शहरातील प्रमुख मार्गाने होताना हा काफीला उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला. एक तासाच्या अवधीमध्ये नामांकन पत्राचा कार्यक्रम आटोपला. साध्या पद्धतीने नामांकन पत्र दाखल करावे असे अगोदर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. आमदार कुणावार यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनी नामांकन पत्र भरून परत आल्यानंतर आपल्या उमेदवाराचे अभिनंदन करून समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.