अधुसूचित सेवा व अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा, जिल्ह्याच्या कामाचे आयुक्तांकडून कौतुक
वर्धा (जिमाका) : महसूल विभागाच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा तत्परतेने नागरिकांना उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर इतर विभागांनी देखील लोकसेवा हक अधिनियमार्त आपल्या अधिसूचित सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक आयुक्त संदीप देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुक्तांनी महाराष्ट्र लोकसेवा हक अधिनियमार्ती अंमलबजावणी तसेच याअंतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणविर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात लोकसेवा हक अधिनियमार्त नागरिकांना सेवा देण्याचे चांगले काम होत आहे. शासनाच्या विविध १ हजार २१२ सेवा अधिनियमार्त आणून कालमर्यादेत त्या उपलब्ध करून देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
सेवा हक अधिनियम नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. त्यामुळे विभागांनी वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. ज्या सेवा अधिनियमार्त अधिसूचित नाही, त्या सेवा देखील अधिसूचित सेवा गृहीत धरून वेळेत दिल्यास नागरिकांना आपण चांगला दिलासा देऊ शकू, या भावनाने काम करावे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी अधिनियमार्त पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेण्यात येतो. जिल्ह्यात काही सेवा तालुकास्तरावरून देखील उपलब्ध करून दिल्या जातात. तालुका व ग्रामस्तरावर विशेष शिबिरे घेऊन जिल्ह्यात सेवा उपलब्ध करून देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली.
जिल्ह्यात महसूल, ग्रामविकास व सेतू अशा तीन यंत्रणांद्वारे कार्यान्वित १३२६ आपले सरकार सेवा केंद्र आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारून सेवा दिल्या जातात. जिल्ह्यात २२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यात अधिनियमार्त कालमर्यादेत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची टक्केवारी तसेच विविध विभागांच्या कामाची माहिती यावेळी सादर करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणविर यांनी अधिनियमार्त जिल्ह्याचा आढावा सादर केला.