समृद्धी महामार्गावर होणार १५ पोलिस मदत केंद्र, गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी घेतला आढावा

वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी शिघ्रगती मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, वाहन चालकांकडून होणारी नियमांची पायमल्ली व यातून दररोज होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी मार्गावर १५ ठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाहीचा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेत संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांच्या कार्यालयात सोमवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता एनएस अन्सारी, सुरवशे तरोडकर, मालखंडाले, पोलिस अधीक्षक महामार्ग वाहतूक पोलिसचे ठाणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंतराव सोळंके, व संबंधित अधिकारी प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *