ऋषभच्या रूपाने वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

अभय बेदमहोता

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

सेलू : कोणत्याही मोठ्या शहरात किंवा सुखवयीन वातावरणात नव्हे, तर ग्रामीण भागाच्या मातीत जिद्द आणि चिकाटीचे रोपे फुलवत, सेलू तालुक्यातील एका अशा दहेगाव गोसावी येथील छोट्याशा गावातून आलेल्या ऋषभ दिलीप पाटील ने अत्यंत मानाची आणि अभिमानाची मजल मारली आहे. भारत सरकारच्या भेट अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या ? ल्र्म्ती इँदौण्ड्ज्ञेग दध्र्त्थ्रसू मध्ये त्याची झालेली निवड ही केवळ एका तरुणाची यशोगाथा नसून, संपूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी आणि विशेषतः दहेगाव गोसावी गावासाठी सोन्याहून पिवळी ठरलेली बातमी आहे. भारताच्या अणुऊर्जेचा कणा समजल्या जाणाऱ्या ज्या संस्थेत ? ऋषभने आपले स्थान निर्माण केले आहे, ती कोणतीही साधी कंपनी नसून भारत सरकारच्या मालकीची, देशातील एकमेव अणुवीज प्रकल्प चालवणारी महारत्न दर्जाच्या तोडीची सरकारी संस्था आहे.

? सप्टेंबर १९८७ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी पूर्णपणे भारत सरकार (अणुऊर्जा विभाग) नियंत्रणखाली काम करते. यांचे ? मुख्य मुख्यालय मुंबई असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि कार्बन-मुक्त अणुविद्युत प्रकल्पांची रचना, बांधकाम आणि यशस्वी देखभाल करणे. तारापूरपासून (महाराष्ट्र) कुडनकुलमपर्यंत (तामिळनाडू) देशाच्या कानाकोपऱ्यात वीज निर्मिती करण्याचे कटीण शिवधनुष्य ही कंपनी पेलते.

खडतर प्रवास आणि सर्वोच्च यश

NPCIL मध्ये निवड होणे ही साधी गोष्ट नाही. डॅऊँसारखी कठीण लेखी परीक्षा आणि अत्यंत कठोर मुलाखतीचा टप्पा पार करून ही निवड केली जाते. भाभा अणुसंशोधन केंद्र यांसारख्या देशाच्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांच्या पंक्तीत बसणाऱ्या या विभागात जागा मिळवणे म्हणजे बुद्धिमत्ता आणि मेहनतीची पराकोटी गाठणे होय. पारंपरिक आव्हानांवर मात करत, दहेगाव गोसावीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या ऋषभने सिद्ध करून दाखवले की, जर मनगटात ताकत आणि डोक्यात ध्येय असेल, तर गरिबी किंवा गावाची सीमा कधीही यशाच्या आड येऊ शकत नाही. सुरक्षित भविष्य आणि देशसेवेचा सुवर्णयोग

या प्रतिष्ठित नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन आणि भते मिळतात. बेसिक पगारसह महागाई भत्ता, मोफत वैद्यकीय सुविधा, सरकारी निवासस्थान, मुलांच्या शिक्षणसाठी मदत आणि १०० इ सुरक्षित सरकारी नोकरीचे आजीवन संरक्षण मिळते.

ही नोकरी केवळ आर्थिक स्थैर्य देणारी नाही, तर देशाच्या अणु कार्यक्रमात थेट अप्रत्यक्षरीत्या योगदान देण्याची संधी म्हणजे एकप्रकारे प्रत्यक्ष देशसेवाच आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण एका ग्रामीण कुटुंबातील तरुण जेव्हा देशाच्या अणुविद्युत महामंडळात उच्च पदावर रुजू होतो, तेव्हा तो केवळ स्वतःचेच नाही तर हजारो युवकांच्या स्वप्नांना दिशा देतो. ऋषभच्या या दैदिप्यमान यशाबद्दल दहेगाव गोसावी गावात आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्वच स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *