तास त. समुद्रपूर येथील भागवत सप्ताहात खासदार अमर काळे यांची उपस्थिती
समुद्रपूर : येथे हनुमान देवस्थान आयोजित भागवत सप्ताहात खासदार अमर काळे यांनी शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी भेट देत कथेचे दर्शन व श्रवण केले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने खासदार अमर काळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राममंदिराजगत सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी उपस्थितीना संबोधित करताना खासदार अमर काळे यांनी विकास निधीच्या असमान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला, ‘माझ्या मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांसाठी मला केवळ ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो. एका आमदारला ५ कोटी रुपये एका विधानसभासाठी मिळत असतील, तर सहा विधानसभा क्षेत्रांसाठी खासदारला कमीत कमी २५ कोटी रुपये मिळायला पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्ताने मी रु. २५ कोटी खासदार निधी वाढवून मागितला आहे व मोदी साहेबांकडून निर्णयाची वाट बघत आहे.
‘जीवन क्षणभंगुर; जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सत्कर्म करा’
भागवत सप्ताहाच्या निमित्ताने बोलताना खासदार अमर काळे यांनी जीवनाचे वास्तव आणि सामाजिक जबाबदारी यावर भाष्य केले, जीवन अस्थिर आणि क्षणभंगुर आहे. मृत्यू सांगून येत नाही. त्यामुळे आयुष्य आहे तोपर्यंत चांगले काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्राकडून वाढीव निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना वार्षिक २५ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. हा निधी म्हणजे जनतेच्या विकासासाठी मिळणारे ‘रिटर्न गिफ्ट’ ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आज १५ ते २० वर्षांच्या तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगत त्यांनी आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुजा मानке यांचे उदाहरण देत जीवनाची अनिश्चितता अधोरेखित केली.
‘आई-वडील हेच आपले परमेश्वर; त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका’
आई-वडिलांबाबत बोलताना खासदार अमर काळे भावुक झाले. ‘ज्या आई-वडिलांनी आपल्या సుखासाठी संपूर्ण आयुष्य खर्च घातले, त्यांनाच वृद्धापकाळात वृद्धाश्रमात ठेवले जाते, ही अत्यंत वेदनादायी आणि भयावह बाब आहे. आई-वडील हेच आपले परमेश्वर आहेत; त्यांची सेवा करा,’ असे त्यांनी सांगितले. तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्याच्या घटनाही मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत.
गावातला एकोपा कायम ठेवा; अन्नाची नासाडी करू नका
तास गावातील सामाजिक एकोपा कायम राहावा, असे आवाहन करत त्यांनी भागवत सप्ताहातील महाप्रसादाच्या वेळी अन्नाची नासाडी टाळण्याचा संदेश दिला. ‘जितके आवश्यक आहे तितकेच अन्न घ्या; अन्न वाया घालू नका,’ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची गंभीरता, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि शेतकरी व ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले.
प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले सचिव दशरथ ठाकरे शहराध्यक्ष बाळू वानखेडे तसेच हनुमान देवस्थान सेवा समिती तासवे अध्यक्ष शरद कोल्हे, उपाध्यक्ष महादेव ठाकरे, महादेव वैद्य, सरपंच प्रफुल उसरे, तसेच शंकर घोटे, अनिल सूर्यवंशी, विशाल आसुटकर, आकाश आसुटकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.