आर्वी शहरात ‘मिशन कोंडीमुक्त वर्धा’ अभियानाचा धडाका!

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १०० कारवाया; वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची विशेष मोहीम

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

आर्वी : वर्धा जिल्ह्यातील वाहतूक कोंडी दूर करून वाहतुकीला शिस्त ल्यावण्यासह रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाच्या बतीने ‘मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आर्वी शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार एकूण १०० कारवाया करण्यात आल्या.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, आर्वी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश देहणकर तसेच विल्लह वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धाचे प्रभारी अधिकारी सहायक विजयकुमार धुळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित पोलिस अधिकारी व अमंलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले, वाहन योग्य ठिकाणी पार्क करणे, सार्वजनिक रस्त्यांवर किंवा ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहने उभी न करणे, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, दुचाकी चालविताना हेलमेटचा आणि चारचाकी चालविताना सीट बेल्टचा वापर करणे, तसेच वेगमर्यादेचे पालन करणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे, अशा महत्त्वाच्या नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

रुग्णवाहिकांना मार्ग देण्याचे आवाहन

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत, रस्त्यावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि रुग्णवाहिका तसेच इतर आपत्कालीन वाहनांना तातडीने मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतःच्या सुरक्षितेतेबरोबरच इतर नागरिकांच्या जीविताचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दंडात्मक कारवाईपेक्षा सुरक्षितेला प्राधान्य

‘मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा’ या अभियानाचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे किंवा दंड वसूल करणे हा नसून, वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे, नियमभंगाला आळा घालणे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आहे. नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

विशेषतः, अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविण्याच्या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढतो, अशा घटनांमुळे संबंधित मुलांच्या भविष्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. जिल्हाभर मोहीम सुरू राहणार

आर्वी शहरातराबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण १०० कारवाया करण्यात आल्या, यापुढील नियममंग करणाऱ्याविरुद्ध नियममानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘मिशन कोंडीमुक्त वर्धा जिल्हा’ अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तने वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन वर्धा जिल्हा वाहतूक पोलीस विभागाच्या बतीने करण्यात आले आहे.

Slug

mission-kondimukt-wardha-arvi-traffic-drive-2026

#Tags

आर्वी, वर्धा न्यूज, मिशन कोंडीमुक्त वर्धा, वाहतूक मोहीम, पोलीस कारवाई, arvi news, wardha police, traffic rules, maharashtra traffic drive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *