प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे हिंगणघाट : येथील संत तुकडोजी वार्ड येथील सहा दुकानाला लक्ष करून अज्ञात चोराने अक्षरशः धुमाकूळ माजवून सात लाख रुपयाचा रोख व दागिने चोरून नेले. या संबंधात प्राप्त शुक्रवार २ ऑक्टोबरला मध्यरात्री येथील मोहता बगीचाच्या जवळ असलेल्या श्री बालाजी ग्रॅनाईट या दुकानात चोराने दुकानाचे शटरचे ताले तोडून आत प्रवेश करून कैचीने ड्राव्हर खोलून ड्रावर मध्ये ठेवलेली अडीच लाख रुपयांची रक्कम तसेच गौशाला ची ३० हजार असा एकूण अशी एकूण दोन लाख ८० हजार रुपये रोख व ड्रावर मध्ये ठेवलेली एक अंगठी व दोन चेन असे सोन्याचे तीन तोळ्याचे दागिने लंपास केले. या चोराने बालाजी ग्रॅनाईट च्या बाजूने असलेल्या गुरुकृपा हार्डवेअर व ओम साई किराणा या दुकानाचे सुद्धा शटर चे ताळे तोडले, मात्र तिथे डॉवरमध्ये काहीच नसल्याने त्या चोराला या दोन दुकानात काही हाती लागले नाही.
विशेष म्हणजे सदर चोराने बालजी ग्रॅनाईट या दुकानात लागलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर सुद्धा सोबत नेले. नंतर या चोराने कलोडे चौकात असलेल्या युगांत को-ऑपरेटिव्ह संस्था कार्यालय, कृष्णा स्टील रेलिंग व खुशी ऑटोमोबाईल या तीन दुकाना पैकी संस्थेचे कार्यालय व दोन दुकानाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे त्याच्या हाती काहीच लागले नाही. विशेष म्हणजे श्री बालाजी ग्रॅनाईट व कलोडे चौका वरील दुकानाचे अंतर एक किलोमीटरचे आहे. व वरील कार्यालय व दुकाने एकाच बाजूला आहे. मोठे नुकसान झालेल्या बालाजी ग्रॅनाईट चे संचालक राजू भोलानाथ गुज्जर यांच्या कुटुंब राजस्थानला गेला होता. त्यांचे नवीन मकानाचे बांधकाम नांदगाव चौरस्ता वरील महाकाली नगरमध्ये सध्या सुरू आहे. त्यांनी सुरक्षा म्हणून दागिने दुकानात आणून ड्रावर मधील एका डब्बीमध्ये ठेवले होते. नेमके त्यांची रोख रक्कम व दागिने असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज वर चोराने डल्ला मारला. सदर चोरीच्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो अज्ञात चोर दिसत आहे. या संबंधात पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून या घटनेबाबत अज्ञात चोराविरुद्ध चोरीच्या गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संत तुकडोजी वार्ड येथील व्यवसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.