पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत अवैधरित्या चोरीच्या रेतीची वाहतुक करणारा अटकेत

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत दिनांक ०१/१०/२०२६ रोजी मध्यरात्री दरम्यान खाजगी चारचाकी वाहनाने मा. पो.नि. यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे. दहेगाव गोसावी यांचे सह त्यांचे पथक हे पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी परिसरात अवैध वाळु चोरी संबंधाने कार्यवाही करीता गस्तीवर असतांना पोलीस कर्मचारी यांना मुखबिर व्दारे माहिती मिळाली की एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व हिरव्या रंगाची ट्रॉली मध्ये देडळगाव शिवनगर गावात राहणारे शाम नैताम व समीर वैद्य हे दोघेही मिळुन ट्रॉलीमध्ये अवैध रित्या चोरीची काळी रेती भरून काही वेळात हमदापुर गावाकडे येणार आहे. अश्या माहिती वरुन देरडा चौक हमदापुर येथे नाकेबंदी करुन छापा टाकला असता आरोपी ट्रॅक्टर चालक नामे शाम भारगुजी नैताम रा. देडळगाव (शिवनगर) हा मौक्यावरुन पसार झाला. मौक्यावर ट्रॅक्टर मालक आरोपी नामे समीर विलास वैद्य वय २५ वर्षे रा. देडळगाव (शिवनगर) ता. सेलु जि. वर्धा हा मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून १) एक लाल रंगाचा सँर्गुलेद्ध कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३२ ए.एक्स ३३६३ किंमत ५,००,००० रू (पाच लाख रूपये) २) एक हिरव्या रंगाची ० कंपनीची ट्रॉली क्रमांक एम.एच. ३२/पी/ २४१० किंमत १,५०,००० रू (एक लाख पन्नास हजार रूपये) ३) नमुद ट्रॉलीमध्ये अंदाजे ०१ ब्रास काळी रेती किंमत १०,००० रू असा एकुण जुमला किंमत ६,६०,००० (सहा लाख साठ हजार रूपये) असा माल मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपुर्ण माल जप्त करण्यात आलेल आहे. शासन तर्फे लेखी तक्रार वरून अपराध क्र. ०१८८ / २०२६ कलम ३०३(२) ३(५) भारतीय न्याय संहिता – २०२३ सहकलम ३(१) १८१ मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री सुनिल महाडिक सा. यांचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे दहेगाव गो. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.फौ. ब्रम्हानंद मुन, पोलीस हवालदार आनंद भस्में, राधाकिसन धुगे पोलीस अंमलदार कांचन चाफले, अनिल चिलगर संदेश सोबाम सर्व नेमणुक पो.स्टे. दहेगाव गोसावी यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *