श्री गुरु तेग बहादूर यांचा ३५० वा शहादी समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा (जिमाका): ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथे दि. ७ डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री गुरु तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरु आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करुणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरु तेग बहादूर ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथेही कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरु तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याच्या इतिहासा सर्वदूर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसील, शहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिख, सिकलीगर, बंजारा, लबाणा, मोहाल, सिंधी समाजाचे गुरुबंधूंना अधिक दृढ होणार आहे. श्री गुरु तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेचे रक्षणारे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांमुळे या सहा समाजांच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधूंना हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

त्यामुळे ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सुरेशचंद्री सूरी ग्राऊंड, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमास शिख, सिकलीगर, बंजारा, लबाणा, मोहाल, सिंधी समाज बांधवांसह इतरही समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाधियत्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *