वर्धा : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ज्वलंत विषयांवर चर्चा करून त्यावर प्रभावी उपाययोजना करता यावी म्हणून विदर्भस्तरीय शिक्षक मेळावा ३१ जानेवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी शेगाव (जि. बुलढाणा) येथील गणेश प्रस्थ मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यामध्ये राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील आयटीआय निदेशकांच्या विविध समस्या, टीईटी संदर्भात शासनाचे धोरण व त्याबाबत शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम, राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, टप्पा वाढ अनुदान, नक्षलग्रस्त, आदिवासी भागामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती व वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा तसेच १५% नक्षलग्रस्त भत्ता सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात यावा, अंशत: अनुदानित शाळा तुकडीवर कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सवलत, अर्जित रजा रोखीकरण व शाळेला वेतनेत्तर अनुदान मंजूर करणे, याशिवाय शिक्षक कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली विविध देयके शालार्थ आयडी प्रकरणे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती तसेच त्यांचे शालार्थ आयडी प्रकरणे, विनाअनुदानित तुकडी वरून अनुदानित तुकड्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे या व अशा अनेक समस्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.