वनमंत्री गणेश नाईक यांची घेतली भेट, गावाचा अभयारण्यात समावेश करण्याची मागणी
वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या रायपूर जंगली गावातील नागरिकांची भावनांची व समस्यांची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन रायपूर जंगली गावाचा अभयारण्य क्षेत्रात समावेश करून नवीन ठिकाणी गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
रायपूर गावातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून, गावातील सुमारे ८० टक्के शेतजमीन जंगलव्याप्त परिसरात असल्याने वन्यप्राण्यांच्या वाவरामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी तसेच नागरिकांना इतर कामासाठी जंगलातून ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ९ सप्टेंबर २०२६ रोजी शेतकरी भगवान धुर्वे यांच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेने अधोरेखित झाले आहे. सतत वन्यप्राण्यांचा वावर असल्याने येथील नागरिक प्रचंड दहशतखाली आहे. धुर्वे यांच्या घटनेनंतर गावातील शेतकरी व शेतमजूर भीती्याच्या वातावरणात असून शेतात काम करण्यास देखील धजावत नाही. तथापि, शेतीची कामे खोळंबली असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. वन्यप्राण्यांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलमधील ये-जा करण्यावरही गंभीर परिणाम होत आहे. गावकऱ्यांच्या सुरक्षितेतळ प्राधान्य देत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वतः पुढाकार घेत रायपूर गावाचा अभयारण्यात समावेश करून पुनर्वसन करण्याची मागणी वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.