राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : तीनोंही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसकडून उभा करण्यात आलेला कथित ‘फेक नॅरेटिव्ह’ पूर्णपणे उघड झाल्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

सेक्रेटरीकडे गेलेले पत्र कोणत्याी नीतिगत अथवा धोरणात्मक विषयाशी संबंधित नसून डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित होते. मात्र त्या पात्राचा चुकीचा अर्थ लावून आयोगामध्ये मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फॉर्म क्रमांक ६ संदर्भातही अनावश्यक संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद केले. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना डॉ. भोयर म्हणाले की, तेलंगणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजय मिळाला तेव्हा निवडणूक आयोग योग्य वाटतो; मात्र भाजप विजयी झाला की त्याच आयोगावर प्रश्न उपस्थित केले जातात.

भारतीय जनता पार्टी, वर्धा जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निवडणूक आयोग, एसआयआर प्रक्रिया आणि मतदार याद्यांबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांवर सविस्तर भूमिका मांडली. पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, निवडणूक आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले आहे कि एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकmताने पार पडल्या असून त्यामध्ये कोणताही मतभेद नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत जाणीवपूर्वक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करतात. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबद्दल जनतेमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी करण्याची ही एक रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला.

ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर उघड झाली आहे. ईव्हीएमबाबतही सातत्याने आरोप करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे. तसेच निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखविण्याचे आव्हान दिले होते, मात्र ते सिद्ध करण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे आता ईव्हीएमऐवजी निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याऐवजी काही पक्षांकडून केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्व राजकीय पक्षांना संधी उपलब्ध असताना त्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *