वर्ध्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रविकांत बालपांडे यांना उमेदवारी

आ. मनिषा कायदे यांची पत्रकार परिषद
वर्धा : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. विकासाचे राजकारण हेच ब्रिद आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा प्रतिसाद दिला आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ‘गेम चेंजर’ ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होईल. सहाही नगर परिषदेंची लढवण्याची तयारी आहे. वर्धा नगराध्यक्षपदाची उमेदवारी रविकांत बालपांडे यांना देण्यात आली आहे. तशी माहिती शिवसेनेच्या जिल्हा निवडणूक निरीक्षक आमदार मनिषा कायदे यांनी दिली.

शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार मनिषा कायदे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. स्थानिक ठिकाणची परिस्थितीनुसार जबाबदारी दिलेली आहे. वर्धा नगराध्यक्षपदाची उमेदवारी रविकांत बालपांडे यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहाही नगर परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याची तयारी आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील. विकास, स्थानिक मुद्द्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे आ. कायदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित, जिल्हाध्यक्ष राजेश सराफ, अनिल देवतळे, गणेश ईखार, श्रीकांत मिरापूरकर, दिलीप भुजाडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *