मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वर्धा आप ची मागणी

 

राबविण्यात येणार resignation dhnyanesh स्वाक्षरी अभियान : श्रीकांत दोड

 

वर्धा : भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण यासाठी आम आदमी पार्टी, वर्धा च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची तसेच ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या आशयाच्या मागणीचे निवेदन आप वर्धाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत ब. दोड यांनी राष्ट्रपती महोदया यांना वर्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.

या सोबतच SIR प्रक्रिया, मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया, Form-6 मधील बदल आणि मतदार यादीच्या डिजिटल प्रणालीचे स्वतंत्र ऑडिट व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी हि श्रीकांत दोड यांनी केली आहे.

दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी The Indian Express ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यात किमान १४ वेळा मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, SIR प्रक्रिया तसेच मतदार यादीच्या डिजिटल व्यवस्थापनाशी संबंधित निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. इंदूर-६ मधील काही बदलांबाबतही त्यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने या वृत्तावर स्पष्टीकरण देताना मागील वर्षातील निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने पडताळणी होणे आवश्यक असल्याचे आप वर्धाचे म्हणणे आहे.

‘निवडणूक आयोग हा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीय मतदाराचा घटनात्मक आयोग आहे, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास सर्वोच्च आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे असे परखड मत जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी व्यक्त केले.

निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, कुणाल लोणारे, संजय आचार्य, खालिद खान, मयुर राऊत, समीर खान, संदीप डंभारे, रूपम तांबेकर, रिशान अली उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *