पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली:वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली करण्यात आली आहे. अनुराग जैन यांच्या जागेवर सौरभकुमार अग्रवाल यांची बदली झाली आहे. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नागपूर या पदावर बदली झालेली आहे.

पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची वर्ध्याचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झालेली आहे. अनुराग जैन यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. अनेक मोठ्या कारवाईदेखील पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या कार्यकाळात करत गुन्हेगारांवर जरब बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर वर्धा पोलीस अधीक्षक म्हणून सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या आधी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे कार्यरत होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *