वृत्तपत्र विक्रेत्यांचे ९ ऑक्टोबरला राज्यभर मोर्चे

वर्धा : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी ९ ऑक्टोबरला राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर परिवारसह मोर्चा काढण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटनेच्या कार्यकारी बैठकीत करण्यात आला. राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक समृद्धी गार्डन सोलापूर येथे शनिवारी पार पडली. संघटनेचे अध्यक्ष पाटणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन बैठकीस सुरुवात झाली. स्वागत राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य गोरख भिलारे यांनी केले. सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून बैठकीस सुरवात केली.

संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर म्हणाले, गेली अनेक वर्षे संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी संघटना प्रयत्न करत आहे. अनेक निवेदने, आंदोलने, बैठका झाल्या.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आता रस्त्यावरची लढाई करावी लागेल. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांच्या चर्चेनंतर पाटणकर यांनी आंदोलनाची घोषणा केली. कार्याध्यक्ष बालाजी पवार म्हणाले, अनेकवेळा मागणी करूनही कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत सरकारला रस्त्यावर उतरुन जाब विचारava लागेल.

घटना ज्या सूचना करेल, आंदोलन देईल त्याची अंमलबजावणी करावी. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर, तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करावे.

सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले, राज्य संघटनेने घेतलेल्या ९ ऑक्टोबरच्या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे. प्रत्येक तालुका व जिल्हा पातळीवर हे आंदोलन करावे. संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे कोल्हापुर, गोरख भिलारे पंढरपुर, दिपक वाघमारे सांगली आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

राज्य संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी कोशाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाटणकर यांनी सविस्तर माहिती दिली. संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून विविध मार्गाने या कल्याणकारी कोषमध्ये निधीची भर घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विनोद पत्रासे, नरहरी लिंगायत, गोरख भिलारे, दिनेश उके आदींनी या विषयावरील चर्चेत भाग घेतला.

बैठकीस रविंद्र कुलकर्णी मालेगाव, विनोद पत्रासे चंद्रपुर, दिनेश उके, गजानन मसणे संजय बडोले गोंदिया, चंद्रकांत घाटोळ, बाबुजलदेवार, गणेशवडगावकर नांदेड, दत्तात्रय सरगर, विशाल रासनकर, दिपक वाघमारे सांगली, नरहरी लिंगायत, शिवाजी वाकोडे परभणी, मनिष वासनिक नागपुर, मल्लिकार्जुन वालेतडवळ, सचिन शेटे बार्शी, रघुनाथ कांबळे, आणा गुंडे, किरण वनगुते, धनंजय शिराळकर, अंकुश परब, सुरेश चौगुले, परशराम सावंत, राजाराम पाटील कोल्हापूर, रविराज शेटे, उत्तम चौगुले सांगोला आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष, सचिव उपस्थित होते.

बैठकीचे आयोजन सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजेंट संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग मेडेगार, सचिव सचिन बाबर, अंबादास शिंदे, अशोक खरात, भीमाशंकर ढमामे आणि नागेश कुंभार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *