तेरा जुगारीयांना ताब्यात घेत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई

वर्धा : शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जुगारीयांना ताब्यात घेतले. यामध्ये ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. यामध्ये १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपींकडून रोखक्कम, तास पत्ते, २ ऑटोरिक्षा, ६ दुचाकी वाहने, १२ मोबाईल फोन असा सुमारे ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चटरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, राजेंद्र हाडके, राजेश डाळ, चेतन दुबे व संतोष इधारे, अभिषेक मते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *