प्रतिनिधी: दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यातील ४ विधानसभा क्षेत्रात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटाचा दिवस असला तरी आर्वीचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी हजारो समर्थकाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. तेव्हा पक्षाने उमेदवारी दिली तर पक्ष नाही तर अपक्ष देव आला तरीही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. अशी वलगणा कार्यकर्त्यांच्या समोर केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात जोष होता. परंतु भाजपाच्या नेत्यांनी दादाराव केचे यांना थेट विमानाने अहमदाबाद ला नेले तेथे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर वर्धेला पत्रकार परिषद घेवून पक्ष मजबूत करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा गेली.
या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, माजी खासदार रामदास तडस उपस्थित होते. परंतु दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानेआर्वी येथील भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले असून केचे यांनी धोके दिल्याचे सांगत आहे. तर वर्धा जिल्ह्यात देवळी, पुलगाव आर्वी,हिंगणघाट, वर्धा येथे अनेक इच्छक उमेदवारानी पक्ष अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात लढत स्पष्ट होणार आहे. वर्धा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे, भाजपाचे उमदेवार डॉ.पंकज भोयर यांनी प्रचाराला सुरुवात केला आहे. देवळी पुलगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रणजीत कांबळे तर भाजपाचे उमेदवार राजेश बकाणे, हिंगणघाट येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले तर भाजपाचे समीर कुणावार, आर्वी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मयुरा काळे तर भाजपाचे सुमित वानखडे, यांनीही प्रचारला सुरुवात केली आहे. उमेदवारांना घरोघरी पोहचण्यासाठी कमी कालावधी मिळत असल्याने उमेदवाराची चांगली तारांबद उडत आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.