५ सप्टेंबरला शास्त्री चौकात भव्य दहीहंडी स्पर्धा

नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रिडा मंडळ आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे आयोजन
वर्धा : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवदुर्गा सोशल सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल वर्धेच्यावतीने ५ सप्टेंबरला शास्त्री चौकात भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळेली लहान बालकांसाठी राधा, कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर इंडियन फोग डॅन्सचा महासंग्राम होणार असून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अनुप जयसवाल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.

दहीहंडी स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस १ लाख १८ हजार १११ तर द्वितीय पुरस्कार ५१ हजार १११, तृतीय पुरस्कार ३१ हजार १११ देण्यात येणार असून इंडियन फोग डॅन्स महासंग्रामासाठी प्रथम पुरस्कार १५ हजार, द्वितीय पुरस्कार ११ हजार, तृतीय पुरस्कार ७ हजार, प्रोत्साहन पुरस्कार १५०० रुपये देण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजक अनुप जयसवाल यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राजेश ठाकुर, पुजा ठाकुर, भरत आमले, राजेश सुधा, पंकज चांडक, आशिष ठाकरे, विजय ठाकुर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *