चाकू जप्त गुन्हा दाखल
वर्धा : चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. चाकू जप्त करत याप्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज रवींद्र येंडाळे (वय २८) रा. स्टेशनफै ल हा स्टेशनफै ल परिसरत लोखंडी धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करून एखादा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने मिळून आला. पोलिसांनी पंकज येंडाळे यास शिताफीने ताब्यात घेत चाकू जप्त केला. याप्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली थानेदार नागेशकुमार चातारकर यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार सुहास चांदोरे, सचिन भारशंकर, मनोज काकपुरे, नवनित वानखेडे, उमेश कुंमभरे यांनी केली.