प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
समुद्रपूर : आजदा शिवारातून पाटला करुन पकडली गाडी पोळ्याचं औचित्य साधून दारूचा साठा पुरवण्यासाठी निघालेली अशोक लेलँडची बडा दोस्त गाडी क्रमांक एम एच ३२ ए जे ६७८० ही गाडी येत असल्याची गुप्त माहितीच्या आधारावर समुद्रपूर पोलिसांनी सापळा रचून आजदा शिवारात गाडीचा पाटला करून गाडी तपासणी केली असतानी त्या गाडीमध्ये रॅकेट कंपनीच्या ३५ खोके ९० ई ३५०० नग किंमत ३,५०,००० ५३ खोक्यात कोकण कंपनीची ५३०० नगकिंमत ५, ३०,००० ५ खोक्यात टॅगो कंपनीच्या ५०० नग किंमत ५०,००० असा ९,५०,००० दारू साठा गाडी किंमत १२ लाख असा एकूण २१,३०००० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाई दरम्यान आरोपी आशिष हाडके राहणार कडाजना हिंगणघाट आरोपी अरविंद शामगुंडे राहणार कडाजना हिंगणघाट अरविंद थूल राहणार आजदा यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या पोलीस निरीक्षक गिरीश मोहोदुरे विक्की मσκε पो.हवा. प्रकाश मैद, कपिल मेश्राम, संदीप उईके संजय वानखेडे यांनी केली पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.