विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या द्वेषपूर्ण एफआयआरचा वर्धेत निषेध

एफआयआर रद्द करण्याची मागणी, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सह विविध सेलच्याप्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरचा निषेध केला असून ही एफआयआर रद्द करण्यात यावी, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

कॉंग्रेच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आता जनता जाब विचारत असून संविधानाच्या रक्षणासाठीच काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. अशी माहिती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नेते डॉ. अभ्युदय मेघे यांनी मनोज चांदुरकर, काँग्रेसचे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *