सेलूकारांचा महावितरणविरोधी महाआक्रोश

स्मार्ट मीटरच्या जाचाविरोधात संतापाचा लाव्हा उसला!
(अभय बेदमोहता)

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

सेलू : सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या स्मार्ट मीटरच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि वाढीव वीज बिलांच्या जाचाविरोधात सेलूवासीयांचा उद्रेक झाला. साहसिक जनशक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या या भव्य आक्रोश मोर्चानंतर महावितरण प्रशासनाची दाणादाण उडाली. या तीव्र आंदोलनादरम्यान एका हतबल शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महावितरणच्या हुकूमशाही कारभाराचे काळे वास्तव पुन्हा एकदा पितळ उघडे पडले आहे.

मागील काही महिन्यांपासून महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना किंवा ग्राहकांची लेखी परवानगी न घेता लादलेले स्मार्ट मीटर आणि त्यासोबत आलेली अब्जाच्या सव्वा रकमेची वीज बिले यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आधीच दुष्काळ, शेतीमालाला नसलेला भाव आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या बळीराजाला महावितरणच्या या लुटारू धोरणाने आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे. घरातील चूल पेटवणे कठीण झाले असताना हजारो रुपयांची बिले हाती पडल्याने जनतेचा संयम सुटला आणि सेलूच्या रस्त्यावर जनसाградаचा लढा उभा राहिला.

आज शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, महिला व नागरिक हातात फलक घेत ‘स्मार्ट मीटर बंद करा, जुने मीटर सुरु करा’ या घोषणसह महावितरण विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयावर धडकले. या महामोर्चाचे नेतृत्व साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक रवींद्र कोटंबकर यांनी केले. त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष चुडामन हांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जैस्वाल आणि शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अमर गुंदी, येळाकेळीचे माजी सरपंच रवी वैरागडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. प्रशासनाच्या दळवी धोरणाचा निषेध करत नेत्यांनी महावितरणच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.

आंदोलन टोकाला गेलेले असताना आणि महावितरणच्या विरोधात संतापाचे वातावरण तापलेले असताना, कार्यालयाच्या प्रांगणात एक अत्यंत थरारक व धक्कादायक घटना घडली. दहेगाव येथील एका हतबल शेतकऱ्याने वाढीव बिलांच्या व कर्जाच्या विळख्याला कंटाळून कार्यालयाच्या परिसरातच गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही क्षण संपूर्ण परिसरात एकच धावपळ उडाली आणि खळबळ माजली. सुदैवाने, उपस्थित सतर्क नागरिक आणि कर्तव्यतत्पर सेलू पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान दाखवत तात्काळ धाव घेतली आणि त्या शेतकऱ्याला वेळेत रोखल्याने एक मोठा अनर्थ टळला. या घटनेने महावितरणच्या कारभारामुळे निर्माण झालेल्या दहशतीची पुन्हा एकदा प्रचिती आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *