गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर
वर्धा (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामानुसार जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांयानी अंतिम मुदत१७ ऑगस्ट पर्यंत घरoghरी भेट देऊन स्वाक्षरीसह गणना पत्रक भरून घेतले. या कामात जिल्ह्यात ८४.३४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात ११ लाख ३७ हजार २४२ इतके मतदार असून त्यापैकी ९ लाख ५९ हजार १११ इतक्या मतदारांचे गणना पत्रक स्वाक्षरी होऊन प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघातील ३१० मतदान केंद्रातील २ लाख ६४ हजार ८५७ मतदारांपैकी २ लाख २७ हजार ५७६ गणना पत्रक, देवळी विधानसभा मतदार संघातील ३३५ मतदान केंद्रातील २ लाख ६१ हजार १ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ४३३ गणना पत्रक, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील ३५१ मतदान केंद्रातील ३ लाख ४०४ मतदारांपैकी २ लाख ५२ हजार ५३४ गणना पत्रक व वर्धा विधानसभा मतदार संघातील ३४६ मतदान केंद्रातील २ लाख ९९ हजार १२० मतदारांपैकी २ लाख ५२ हजार ५६८ मतदारांचे गणना पत्रक भरून व स्वाक्षरी घेऊन जमा करण्यात आले आहेत.
मतदारांच्या गृहभेटीनंतर १ लाख ७८ हजार १३१ (१५.६६ टक्के) इतके मतदार गणना पत्रक जमा न होणे या प्रवर्गतात नोंदविण्यात आले आहेत.
यामध्ये आर्वी सापडून न शकलेले गैरहजर ३ हजार ५२२, कायस्वरुपी स्थलांतरीत २० हजार ६६८, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ४ हजार १६९, मृत ८ हजार ८७४, इतर ४८ असे एकूण ३७ हजार २८१ मतदार आढळून आले. देवळी मध्ये सापडून न शकलेले गैरहजर १ हजार ३०४, कायस्वरुपी स्थलांतरीत २२ हजार ८०९, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ९ हजार १८, मृत १२ हजार ४२५, इतर ७२ असे एकूण ४५ हजार ६ २८ मतदार आढळून आले. हिंगणघाट मध्ये सापडू न शकलेले गैरहजर ४ हजार ११०, कायस्वरुपी स्थलांतरीत २४ हजार ९०७, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ४ हजार ३८८, मृत १४ हजार ४०६, इतर ५९ असे एकूण ४७ हजार ८७० मतदार आढळून आले. वर्धामध्ये सापडू न शकलेले गैरहजर १ हजार ३६७, कायस्वरुपी स्थलांतरीत २६ हजार ७३५, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ७ हजार १९८, मृत ११ हजार १७२, इतर ८० असे एकूण ४७ हजार ३५२ मतदार आढळून आले.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील ११ लाख ३७ हजार मतदारांना १०० टक्के गणनापत्रक वितरीत करण्यात आले असून गणना पत्रक जमा न झालेल्या नावाच्या याद्या संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://wardha.gov.in/en/special-intensive-revision-2026-asdd-voter-list-absent-shifted-dead-duplicate/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.