मधुकर इंगळे (तिगावकर) यांचे निधन

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा: संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे माजी उपाध्यक्ष मधुकर जानराव इंगळे तिगावकर (८८ वर्षे), रा. लहानुजीनगर यांचे रविवार, दि. २० रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी, मुले संजय, राजेश, मुलगी सोनाली रितेश डोर्लीकर आणि मोठा आप्त परिवार असून ते शालिनी दत्ताजी मेघे यांचे वडीलबंधू होत.

त्यांचे अध्यात्म व विज्ञानाच्या अंगाने संतसाहित्यावर भाष्य करणाऱ्या ‘संत वचनामृत’ या ग्रंथाचे चार खंड प्रकाशित आहेत. मधुकर इंगळे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केल्याने सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागास त्यांचे देहदान करण्यात आले. इंगळे तिगावकर कुटुंबातील हे चौथे देहदान असून त्यांचे वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जानराव इंगळे तिगावकर यांचे वर्धा जिल्ह्यातील पहिले देहदान सेवाग्राम रुग्णालयात १९८८ साली करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *