खासदार अमर काले यांचा सरकारला इशारा; दुष्काळग्रस्त यादीत कारंजाचा समावेश, सरसकट कर्जमाफी व वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना एक कोटींची मदत; नारा टी-पॉइंटवर पाच तास आंदोलन
कारंजा : कारंजा तालुका सन २०२६च्या दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत, सरसकट कर्जमाफी आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने खासदार अमर काले यांच्या नेतृत्वात कारंजा येथील अमरावती-नागपूर महामार्गावरील नारा टी-पॉइंट येथे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी २.३० वाजेपर्यंत तब्बल चार ते साडेपाच तास सुरू होते. यावेळी शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले, विशेष म्हणजे या आंदोलनात महिला नेतृत्वां सा. मसुराताई काळे, सौ. हर्षाताई बेलखोडे यांचे सह बऱ्याच महिला रखरखत्या उन्हाची पर्वा न करता रस्ता रोको आंदोलनात मोठ्या हिरीने सहभागी झाल्या होत्या. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारंजा तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
कारंजा तालुक्यावर अन्याय का?
वोलताना खासदार अमर काळे यांनी कारंजा तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली, नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याऐवजी दुष्काळग्रस्त यादीतूनच तालुक्याला वगळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. कारंजा तालुक्याच्या तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व दुष्काळी सवलती व मदत मिळवून द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रायपूर-जंगलीतील वाघाच्या हल्ल्याच्या घटनेवरून पालकमंत्र्यांवर टीका
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबा्याच्या प्रश्नावरूनही खासदार अमर काळे यांनी सरकार आणि पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. रायपूर-जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांच्या दुःखाची दखल घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली नाही, असा आरोप खासदार अमर काळे यांनी आपल्या भाषणातून केला. संबंधित कुटुंब दुःखात असताना पालकमंत्री कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहिले, इतर मंत्र्यासोबत पुष्याची थरी डान्स पाहण्यात व्यस्त होते आपल्या मतदार संघातील दुःखातील कुटुंबाची भेट तर सोडा तसेच कुटुंबाच्या दुःखाची साधी दखलही घेतली नाही, उलट प्रशासनाकरवी अंत्यधिकारिता कुटुंबवर व गावकऱ्यांवर दबाव टाकला जात होता, अशी टीका त्यांनी केली. खासदार काळे यांनी यावेळी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘दुःखात असलेल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र, या कुटुंबाकडे साधी विचारपूस करण्याची संवेदनशीलता दाखवली गेली नाही,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री विदर्भातील असूनही कारंजाकडे दुर्लक्ष : अमर काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असून नागपूर हे कारंजा तालुक्याच्या जवळचे शहर आहे, याकडेही खासदार अमर काळे यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री ज्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात, त्याच विदर्भातील कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे; मात्र कारंजा तालुक्याच्या प्रश्नाकडे शासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची भावना निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना खासदार काळे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघेही कारंजा तालुक्याच्या प्रश्नाबाबत असंवेदनशीलता वागत असल्याचा आरोप केला. विशेषतः पालकमंत्र्यांनी असंवेदन क्षीलतेची हद्द पार केल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना एक कोटींची मदत द्या
वाघाच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना शासनाने केवळ औपचारिक मदत न देता प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली. कमावता सदस्य गमावल्यानंतुर कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते, त्यामुळे अशा कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली.
जयदादा बेलखोडे मित्र परिराणाचा जाहीर पाठिंबा
या आंदोलनाला स्वराज्य शेतकरी संघटना तसेच जयदादा बेलखोडे मित्र परिवाराने जाहीर पाठिंबा दिला. जयदादा बेलखोडे व हर्षाताई बेलखोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले.