प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारेवर्धा : अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी ऐतिहासिक आणि कठोर कारवाई करत प्रथमच ‘प्रीवेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ?क्ट, १९८८ (PITNDPS)’ अंतर्गत एका सराईत ड्रग तस्कराला स्थानबद्ध केले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थाच्या विरोधीतील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कायदेशीर कारवाई मानली जात आहे.
गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील टाका ग्राऊंड परिसरातील राकेश उर्फ मुन्ना शिवदास जनबंधू याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत सात गुन्हे नोंद आहेत. वारंवार अटक करूनही आणि प्रतिबंधत्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नसल्याने वर्धा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाकडे PITNDPS अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला PITNDPS कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. आदेशानंतर आरोपीची खाजगी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे करण्यात आली.
जिल्ह्यात प्रथमच PITNDPS कायद्यांतर्गत आरोपी स्थानबद्ध काय आहे PITNDPS कायदा?
PITNDPS (Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988) हा प्रतिबंधत्मक नजरकैदेसाठीचा विशेष कायदा आहे. या कायद्याचा उद्देश केवळ गुन्हा घडल्यानंतर शिक्षा करणे नसून, सराईत अमली पदार्थ तस्करांना भविष्यात पुन्हा तस्करी, विक्री किंवा अवैध जाळे चालविण्यापासून रोखणे हा आहे.
या कायद्यांतर्गत कारवाई करण्यापूर्वी पोलिसांकडून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, एनडीपीएस अंतर्गत नोंद असलेले गुन्हे आणि त्याच्या हालचालींचा सविस्तर अहवाल तयार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर आरोपीला कालावधीत त्याच्या नजरकैदेची वैधानिक समीक्षा सल्लागार मंडळाकडून केली जाते आणि सामान्य जामीन प्रक्रियेद्वारे तात्काळ सुटका मिळत नाही.
वर्धा जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, सराईत ड्रग तस्करांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.